कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याचे चित्र असताना देखील नागरिकांचे मात्र ‘हम नहीं सुधरेंगे’ हीच मनोवृत्ती दिसते. याच मनोवृत्तीमुळे 22 फेब्रुवारीला लोकशाही न्यूजच्या रिपोर्टरला ठाण्यात धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी धक्काबुक्की करणाऱ्याला त्याच रात्री अटक केली. तर, आता तीन दिवसांनी (25 फेब्रुवारी) ठाणे महापालिकेने दुकान सील केले आहे.
राज्यातील कोरोनाचा आकडा जवळपास नऊ हजार झाला आहे. पण असताना देखील लोक अतिशय बेफिकिरी दाखवत आहेत. ठाण्यात 22 फेब्रुवारीला असाच बेजबाबदारपणा पाहायला मिळाला. लॉकडाऊनची भीती जनतेच्या मनात आहे का? याची रिअॅलिटी चेक करण्यासाठी ठाणे बाजारपेठेतून लोकशाही न्यूजचे प्रतिनिधी निकेश शार्दुल यांनी आढावा घेतला. तिथे अनेक नागरिक आणि व्यापारी विनामास्क आढळले. जे.डी वनगे या मसाल्याच्या व्यापाऱ्याला मास्क का घातला नाही, अशी विचारणा केली असता त्याने निकेश शार्दुल यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि माईक खेचून घेतला. याती दखल ठाणे महापालिकेने आज (25 फेब्रुवारी) घेतली आणि त्याचे दुकान सील केले,
Comments
Loading…