in ,

फुटबॉलच्या मैदानात प्रेक्षकांचा जल्लोष सुरू असताना कोसळला स्टँड

नेदरलँडच्या फुटबॉल लीग स्पर्धा चालू होती. नेक निजमेजेनला पराभूत केल्यानंतर फुटबॉल क्लब विटस्सी अरन्हेमचे चाहते डच इरेडिवाइस मैदानात स्टँडवर उभे राहून जल्लोष करत होते. त्यावेळी स्टँड खाली कोसळला. या घटनेचा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

नेदरलँडच्या फुटबॉल लीग स्पर्धे विटस्सी अरन्हेम संघाने नेक निजमेजेनला १-० ने पराभूत केलं. सामना संपल्याची घोषणा होताच त्याचे चाहते स्टँडमध्ये उभे राहिले. त्यांच्यासोबत मैदानातील खेळाडूही जल्लोष करत होतो. दरम्यान अचानक चाहत्यांच्या वजनाने स्टँड कोसळला. इतकी दुर्घटना होऊनही तुटलेल्या स्टँडवरही चाहते नाचताना दिसले. या घडलेल्या दुर्घटनेनंतर निजमेजेनच्या महापौरांनी दु:ख व्यक्त केलं आहे. “या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. तरी जे काही झालं ते चांगलं नव्हतं. यासाठी एका चौकशी समितीची गठीत केली आहे. कारण हा स्टँड कोसळण्याच्या घटनेसाठी नेमक कोण जबाबदार होतं? याचं कारण समजू शकेल”, असं त्यांनी सांगितलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | राज्यात २ हजार ७९१ रुग्ण कोरोनामुक्त

जुन्या भांडणाचा राग काढत तरुणाच्या हत्येचा प्रयत्न