in

IND vs ENG 4th Test Day 3 Live : 3 बाद 270 धावांसह भारत मजबूत स्थितीत

भारतीय सलामीवीरांनी दुसऱ्या डावात आश्वासक सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसअखेर रोहित शर्मा (20) आणि लोकेश राहुलने (22) 16 षटकात 43 धावांपर्यंत मजल मारली आहे. अद्याप इंग्लंड 56 धावांनी आघाडीवर आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना इंग्लंडमधील ओव्हल मोदानात सुरु आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. जो इंग्लंडच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. आधी कर्णधार विराट कोहलीचं (50) अर्धशतक आणि अखेरच्या काही षटकांमध्ये शार्दुल ठाकूरने (57) जोरदार फटकेबाजी करत ठोकलेलं अर्धशतक, याच्या जोरावर भारतीय संघाने कशीबशी 191 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या इंग्लंडची सुरुवातदेखील चांगली झाली नाही. जसप्रीत बुमराहने चौथ्याच षटकात इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर बाद करत भारताची स्थिती मजबूत केली. त्यानंतर दिवसाचा खेळ संपायला एकच षटक बाकी असताना उमेश यादवने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला बाद करत दिवसाची गोड सांगता केली. आजही भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रात आक्रमक मारा केला.

पहिल्या सत्रात इंग्लंडची अवस्था 5 बाद 62 अशी झालेली असताना मात्र ऑली पोपने (81) मोर्चा सांभाळला. त्याने जॉनी बेअरस्टो (33), मोईन अली (35) या दोघांसोबत महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचत इंग्लंडला सुस्थितीत नेऊन ठेवलं. अखेरच्या षटकात ख्रिस वोक्सने अर्धशतकी खेळी करत इंग्लंडला 290 धावांपर्यंत मजल मारुन दिली. भारताकडून या डावात उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराने प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडने पहिल्या डावात 99 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली आहे. दिवसअखेर रोहित शर्मा (20) आणि लोकेश राहुलने (22) 16 षटकात 43 धावांपर्यंत मजल मारली आहे. अद्याप इंग्लंड 56 धावांनी आघाडीवर आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tokyo Paralympic 2020; शूटिंगमध्ये मनीष नरवालनं मिळवलं सुवर्णपदक

…आणि मी आधी घरी जाऊन माझा लेहेंगा चेक केला…राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा…