in ,

राज्यात राहुल गांधी यांचा वाढदिवस ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार – नाना पटोले

खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यात संकल्प दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. कोरोनाचे संकट असल्याने वाढदिवस उत्सवी स्वरूपात साजरा न करता गरिब जनतेला रेशन, अन्नधान्य, औषधे, वैदकिय साहित्य वाटप करून तसेच कोरोनमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी कुटुंबांनाही मदत करण्याचा संकल्प काँग्रेसने केला असल्याची महिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नसून २०२४ साली राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प या दिवशी केला जाणार आहे असेही पटोले यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मिल्खा सिंग यांच्या निधनानं फरहान अख्तर भावूक; म्हणाला…

मल्ल्याला दणका; ६२०० कोटींचे शेअर्स विकून किंगफिशरची होणार कर्जवसुली