in

गोष्ट सुप्रिया सुळे यांच्या जन्माची

पुण्यातील सदू शिंदे या प्रसिद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू यांच्या कन्या असलेल्या प्रतिभा शिंदे व कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचा विवाह १ ऑगस्ट १९६७ साली बारामतीमध्ये झाला. पवारांना उत्तम ‘प्रतिभे’ची साथ लाभल्याने त्यांच्या संसाररुपी वेलीला ‘सुप्रिया’ नावाचे एक कन्यारत्न प्राप्त झाले.

प्रतिभा यांच्यासोबत ज्‍यावेळी लग्‍न ठरले त्‍यावेळी शरद पवार यांनी एकच अट घातली होती. ती म्‍हणजे, आपल्याला एकंच मुल हवं. मग ते मुलगा असो की मुलगी.

३० जून १९६९ रोजी पुणे येथे सुप्रिया यांचा जन्म झाला. त्‍या एकुलती एक मुलगी आहेत, असा विचारही न करता कुटुंब नियोजन करण्याचा धाडसी निर्णय पवारांनी घेतला. तब्बल ५१ वर्षांपूर्वी जेव्हा समाज एवढा पुढारलेला किंवा आधुनिक विचारांचा नसताना दोघांनी हा निर्णय घेतला होता.

त्यातून दोघांची आधुनिक विचारसरणी अधोरेखित होते. अशा विचारांच्‍या कुटुंबात सुप्रिया यांचे संगोपन झाले. त्‍यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. शिक्षणाबद्दल कसलीही सक्ती कधीच झाली नाही. ना लग्नाबाबत. त्‍यांच्‍या आयुष्याचे सगळे निर्णय स्वत: घेतले.

त्‍यांचे शालेय शिक्षण नाना चौकातील सेंट कोलंबस हायस्कूलमध्ये झाले. पुढे बारावीनंतर त्‍यांनी जयहिंद कॉलेजमधून मायक्रोबायोलॉजीमध्ये बीएससी केले. एका लेखात म्हटल्यानुसार, कॉलेजात त्‍या खूप लाजाळू आणि अंतर्मुख होत्‍या. जवळच्या चार-पाचच मैत्रिणी होत्या.

सुप्रिया सांगतात की, माझ्या शाळेत बाबांनी माझ्या बहुतेक सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. इतर पालकांप्रमाणे ते रांगेत उभे राहिले आहेत. बाहेरच्या जगासाठी ते मुख्यमंत्री वगैरे असले तरी जेव्हा ते माझ्यासाठी शाळेत येत असत तेव्हा ते केवळ सुप्रिया यांचे बाबा असतात.

त्‍या जेव्‍हा कॉजेलमध्‍ये होत्‍या तेव्‍हा शरद पवार मुख्‍यमंत्री होते. तरीही सर्वसामान्‍य मुलीप्रमाणे त्‍या बसने कॉलेजला ये-जा करत. शिवाय त्‍यांनी घरून केवळ दहा रुपयांचा पॉकेट मनी मिळायचा.

महाराष्ट्रातील आणि केंद्रातील राजकारणातील एक ‘पॉवरफुल पवार’ हे नाव पाठीमागे असूनही या नावाचा कधीही उपयोग न करता स्वतःचा रस्ता त्यांनी स्वतः तयार केला, असंही ते सांगतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Dilip Kumar | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात दाखल

आषाढीवारी पायी चालत जाण्यासाठी आझाद मैदानावर वारकरी मंडळाचे भजन आंदोलन