in

हवाई दलाची ताकद वाढणार; 10 राफेल विमानं होणार भारतात दाखल

चीनवर नजर ठेवण्यासाठी भारत राफेल विमानाचा वापर करत आहे. त्याचबरोबर लवकरच आणखी 10 राफेल लढाऊ विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील होणार आहेत. येत्या 2-3 दिवसांत तीन राफेल लढाऊ विमाने भारतात पोहोचतील अशी माहिती मिळत आहे.

एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात राफेल लढाऊ विमाने आणि त्यांचे ट्रेनर व्हर्जन भारतात दाखल होऊ शकतात. त्याचबरोबर या 10 राफेल विमानांचे भारतात आगमन झाल्यानंतर भारतीय हवाई दलात राफेल विमानांची संख्या वाढणार आहे. आतापर्यंत 11 राफेल विमानं भारतात आहेत आणि आणखी 10 विमाने आल्यानंतर भारताकडील राफेल विमानांची संख्या 21 वर जाणार आहे.

भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेल लढाऊ विमानांचा करार झाला आहे. या विमानांसाठी 59,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यापैकी 11 राफेल विमानंआतापर्यंत भारतात पोहोचले आहेत. ते अंबाला येथील सुवर्ण अ‍ॅरो स्क्वॉड्रॉनचा भाग आहेत. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये आता आणखी 10 राफेल विमानं तैनात करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

पश्चिम बंगालच्या हशिमारा येथे राफेल विमानं तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर बंगालमध्ये चीन भूतान ट्रायझँक्शनच्या जवळ आहे. चीन सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राफेलच्या मदतीने भारत चीनवर नजर ठेवून आहे. अशा परिस्थितीत नवीन राफेल विमानांचीही चीनवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नगरसेविकेच्या मुलाचा डोक्यात गोळी लागल्यानं मृत्यू

शिर्डी साईबाबांचे मंदिर ‘या’ वेळेत भाविकांसाठी खुले