in

‘लोकशाही’च्या मोहिमेचे यश; गुटखाबंदीवरून पोलीस आणि राज्य शासनाला हायकोर्टाच्या नोटिसा

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात पानमसाला, गुटखाबंदी कडक करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेवर पोलीस व राज्य शासनाला नोटिसा काढण्यात आल्या आहेत. तांभेरे (जि. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांची ही याचिका केली असून लोकशाहीच्या गुटखाबंदीमुक्त महाराष्ट्र या मोहिमेला यश आले आहे.

पान मसाला, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोग, हृदयरोग, पोटाचे विकार, त्वचारोग होतात. त्यामुळे अन्न सुरक्षाआयुक्तांनी (मुंबई) परिपत्रकाद्वारे राज्यात या पदार्थांच्या उत्पादन, वाहतूक, विक्री, वाटप, सेवनावर प्रतिबंध घातले आहेत. प्रतिबंध असतानाही त्याचे उत्पादन, वाहतूक, विक्री होत आहे. कोरोनाकाळातही या पदार्थांच्या सेवनामुळे रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत थुंकण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे कोरोना वाढण्याची भीती आहे. पोलीस प्रशासन, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन कारवाई करीत नसल्याने बोगस गुन्हे दाखल होत असून आरोपीना त्यातून सवलत मिळत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

संबंधित बंदीच्या कार्यवाहीसाठी प्रत्येक जिल्ह्यांत पोलीसांनी विशेष पथक स्थापन करावे, पोलीस प्रशासनाने, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांबरोबर कार्यवाही करावी, तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा चालू करावी व बोगस कार्यवाही करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एम. जी. सेवळीकर यांनी पोलीस प्रशासनाला व राज्य शासनाला नोटिसा काढल्या व सर्वप्रतिवादींना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी १५ एप्रिलला ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. सतीश तळेकर, प्रज्ञा तळेकर, अजिंक्य काळे तर, शासनातर्फे डी. आर. काळे काम पाहात आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CoronaVirus : देशातील नव्या रुग्ण संख्येत सातत्याने घट

…आणि मोदींना अश्रू अनावर!