in

अफगाणिस्तानामध्ये आज पासुन ‘तालिबानराज’ !

२० वर्षांनी अफगाणिस्तान तालिबानी हस्तगत केले. आता तालिबान्यांकडून सत्ता स्थापन करण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, शुक्रवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सत्ता स्थापन करणार आहेत. 15 ऑगस्ट रोजी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्ताची सत्ता त्यांच्या हाती आली. अमेरीकेचे सैन्य मायदेशी परतल्या नंतर तालिबान्यांनी आपला विजय जाहीर केला.

अमेरिकी सैन्य माघारी परतल्यानंतर संपूर्ण देशाचा ताबा मिळवणारं तालिबान सध्या देशाचं सरकार चालवण्याची तयारी करत आहे. सध्या अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट असून हे सरकार पूर्णपणे आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असणार आहे. अफगाणिस्तान दुष्काळाशी लढत आहे असून जवळपास २ लाख ४० हजार नागरिकांना संघर्षापोटी आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय देणगीदार आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने नवीन सरकारची वैधता अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तालिबानने देशात अडकलेल्या विदेशी नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर जाऊ देण्याचं आश्वासन दिलं आहे. पण काबूल विमानतळ अद्यापही बंद असल्याने अनेक लोक शेजारच्या देशांमध्ये पलायन करत आहेत.

अफगाणिस्तानमधील घडामोडींचा देशातील कोणत्याही राजकीय पक्षाने मतदारांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी वापर करू नये आणि केल्यास सरकारने कारवाई करावी, असं आवाहन ‘फ्रेंड्स ऑफ अफगाणिस्तान’ फोरमने केलं आहे. अफगाणिस्तानात शांतता प्रक्रिया सुरू करून लोकशाही मार्गाने राजकीय सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावे. त्यासाठी कोणत्याही देशाने आपल्याला वेगळे न ठेवता सर्वसमावेशक धोरणाद्वारे सामूहिक प्रयत्न करावेत व आपले योगदान द्यावे. तेथील भूमीवरून कोणत्याही देशाविरोधात अतिरेकी कारवाया केल्या जाऊ नयेत, त्यांना पाठबळ दिले जाऊ नये, असं फोरमने म्हटले आहे.

काय आहे भारताची भूमिका ?
केंद्र सरकारनेही दोहा येथे नुकतीच तालिबान प्रतिनिधीशी चर्चा केली. त्याच धर्तीवर चर्चा प्रक्रिया पुढे सुरू ठेवून अफगाणिस्तानमधील भारतीय व अन्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नातून मार्ग काढण्यात यावा, असे आवाहन फोरमने केले आहे. अफगणिस्तानच्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ नये, असे आवाहन फोरमने तालिबानींना केले आहे. या पत्रकावर माजी परराष्ट्रमंत्री के. नटवरसिंह, माजी केंद्रीय वित्त व परराष्ट्रमंत्री यशवंत सिन्हा, माजी पेट्रोलियममंत्री मणिशंकर अय्यर, दिल्लीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग, माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो, प्रसिद्ध लेखक डॉ. वेदप्रकाश वैदिक, सईद नक्वी, माजी राजदूत के. सी. सिंग, फोरम फॉर न्यू साऊथ एशियाचे संस्थापक सुधींद्र कुलकर्णी, ज्येष्ठ वकील माजीद मेमन, गांधीवादी विचारवंत संदीप पांडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात उद्यापासून धुवादार

Tokyo Paralympics | आशियाई विक्रमासहीत प्रवीण कुमारला रौप्यपदक