in

जालन्यात शिक्षकानेच केलं शिक्षकाचं अपहरण

जालन्यात शिशकांनेच केलं शिक्षकाचं अपहरण केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात घडली आहे. तीन लाख रुपयांच्या खंडणीसाठी शिक्षकानेच शिक्षकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात घडली आहे. शिवाजी चावरे असं अपहरणकर्त्या शिक्षकाचं नाव आहे.

देशगव्हाण येथील शिक्षक घनश्याम भोसले हे आपल्या पत्नीला आणण्यासाठी माहेर भायगाव येथे दुचाकीवर जात होते. दरम्यान आरोपी शिक्षक आणि अन्य दोघांनी कार आडवी लावत शस्त्राचा धाक दाखवत भोसले यांना कारमध्ये बसवले. भोकरवाडीजवळील पेट्रोलपंपावर त्यांनी भोसले यांच्या एटीएमधील 15 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर एका महिन्याच्या आत तीन लाख रुपये आणून देण्याची धमकी देत भोसले यांना पाचोडजवळील टोलनाक्यावर उतरून दिलं. दरम्यान घनश्याम भोसले यांनी अंबड पोलिस ठाणे गाठत आरोपी शिक्षक शिवाजी चावरे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अपहरणकर्ता शिक्षक शिवाजी चावरेला अटक केलीये.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सचिनपाठोपाठ युसूफ पठाणही कोरोना पॉझिटिव्ह

“होळी रे होळी शिमग्याची पोळी” तळकोकणातील शिमगोत्सव