in

श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी “A फक्त तूच” ची टीम

टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर “A फक्त तूच” या चित्रपटातुन पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. जयदीप फिल्म प्रॉडक्शन च्या चित्रपटाची निर्मित या चित्रपटात एका वेगळ्या नात्याची गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचं टीजर पोस्टर श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी लाँच करण्यात आलं. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होते.

समुद्राची उसळलेली लाट, गुलाबाचं फुल हातात घेतलेल्या त्याच्या हातावर तिनं ठेवलेला हात टीजर पोस्टरमध्ये दिसत आहे. ‘तर कारण आपलं नातं वेगळं आहे…’ ही चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यामुळे एक वेगळी आणि रोमँटिक कथा चित्रपटातून पहायला मिळेल असा अंदाज टीजर पोस्टरवरून करता येतो. नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार असून. टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंती मिळवलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर ही फ्रेश जोडी चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विमान प्रवास होणार स्वस्त! आजपासून विमानसेवा पूर्ण क्षमतेनं सुरू

गुरु माँ कांचनगिरी यांनी घेतली राज ठाकरेंची भेट