in

बलात्कार पीडितेची गावकऱ्यांनी काढली धींड

देशात कोरोनाची परिस्थिती बिकट असतानाच मध्य प्रदेशमधून एका धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. मध्य प्रदेशातील आदिवासी पट्ट्यातील अलीराजपूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने बलात्कार केला. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी संबंधित आरोपीबाबत पोलिसात तक्रार न करता त्याची आणि पीडितेची गावात धींड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे

मध्य प्रदेशातील एका तरुणाने बलात्कार केला. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी संबंधित आरोपीबाबत पोलिसात तक्रार न करता त्याची आणि पीडितेची गावात धींड काढली. याप्रकरणी
पीडितेने पोलिसात तक्रार केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना ही रविवारी घडली.

पीडितेच्या नातेवाईकांनी आणि कुटुबियांनी आरोपी आणि पीडितेला रस्सीने बांधून गावात धींड काढली. अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला. अनेकांनी या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. पोलिसांनी आधी बलात्कार करणाऱ्या आरोपी विरोधात एफआरआय दाखल केलाय. तर दुसरा एफआरआय तिला छळणाऱ्या गावकऱ्यांविरोधात दाखल केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Dehu Beej Sohala; देहूच्या वेशीवर विठ्ठल नामाच्या गजरात वारकऱ्यांचं आंदोलन

नवनीत राणा उतरल्या व्हॉलीबॉलच्या मैदानात… रंगला आमदार विरुद्ध खासदार सामना