in ,

दीड वर्षांनी सुरु झालेल्या नाट्यगृह आणि सिनेमागृहाकडे प्रेक्षकांची पाठ

मयुरेश जाधव | अंबरनाथ | राज्य सरकारनं परवानगी दिल्यानंतर आजपासून पुन्हा एकदा राज्यभरातली नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू झाली आहेत. राज्य सरकारनं दिलेल्या निर्देशांचं पालन करून आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेऊन नाट्यगृह, सिनेमागृह सुरू झाली आहेत. अंबरनाथ शहरातील एकमेव मल्टीप्लेक्स असलेल्या मिराज सिनेमामध्ये व्यवस्थापना कडून प्रेक्षकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन सिनेमागृह सुरू करण्यात आलं आहे. सिनेमागृहात सुरुवातीला एक स्क्रिन 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यात आली आहे. त्यात एक खुर्ची सोडून एका खुर्चीवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळी 10 वाजता एका चित्रपटाचा पहिला शो होता. मात्र या पहिल्या शो ला एकही प्रेक्षक उपस्थित नसल्यानं हा शो रद्द करण्यात आला. आजपासून चित्रपटगृह सुरू झाल्याची पुरेशी माहिती लोकांना नसल्यानं प्रेक्षक आले नसावेत, अशी शक्यता यावेळी व्यवस्थापनानं व्यक्त केली. मात्र येत्या काळात जसजसे नवीन चित्रपट रिलीज होतील, तशी जुनी गर्दी पुन्हा एकदा चित्रपटगृहात दिसेल, असा विश्वास यावेळी व्यवस्थापनाने व्यक्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नव्या स्पायवेअरचा मोबाईल डेटावर होऊ शकतो हल्ला!

भारतीय सैन्यातील महिला अधिकाऱ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!