in

हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ

गजानन वाणी | हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालीत पोलिसांना सळो की पळो करून सोडलंय, वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात नागरिकांनी बंद पुकारला त्या रात्री सुद्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी चोऱ्या करून पोलिसांचा धाक उरला नाही,हेच चोरट्यांनी पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यात अवैध धंदे बंद करा म्हणून भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून अवैध धंदे बंद करा म्ह्णून मागणी केली, पोलिसांना अवैध धंद्यावर तर अंकुश घालता आलच नाही,पण मागील दोन तीन महिन्यांपासून जिल्ह्यात चोरट्यांनी हैदोस घालून पोलिसांची झोप उडविली आहे. जिल्ह्यात मागील दोन तीन महिन्यांपासून लूटमार,जबरी चोरी,वाटमार्याच्या सतत घटना घडत आहेत. वसमत येथे बंदुकीचा धाक दाखवून गॅस एजन्सीच्या कर्मचार्याच्या लुटल होत,त्यानंतर एकाच दिवशी हिंगोली शहरात दिवसा ढवळ्याना व्यापाऱ्याला धूम स्टाइलने चोरट्यांनी लुटत लाखोंचा मुद्देमाल पळविला होता.

हिंगोली शहरातील उच्चभ्रू वस्तीत भर दिवसा बँक अधिकाऱ्यांच्या घरात घुसून अधिकार्याच्या मुलांना बांधून टाकून पत्नीवर चाकू हल्ला केल्याची घटना ताजी आहे. कळमनुरी बोल्डा रोडवर एका व्यापाऱ्याची लूटमार करण्यात आली आहे. परवाच्या रात्री दत्तगुरू फार्मच्या मालकाला कळमनुरी हिंगोली मार्गावर अडवून चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. त्यात ते जखमी झाले आहेत, त्याच रात्र हिंगोली शहरातील व्यंकटेश्वरा हार्डवेअर मध्ये चोरट्याने डल्ला मारला. या सगळ्या चोरीच्या घटनांना कंटाळून या घटनांच्या निषेधार्थ व्यापारी महासंघाने शुक्रवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा नकर्णय घेतला असता, बंदच्या रात्री सुद्धा चोरट्यांनी कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे चौघांची घर आणि ग्रामपंचायत कार्यालयाच ऑफिस फोडून पोलिसांच्या नाकी नऊ आणला.

शेषराव किसनराव निलकंठे, बाबाराव शंकरराव नीळकंठे, गजानन भारती आणि पांडुरंग बाबाराव निलकंठे यांचे घर फोडले. एवढं कमी की काय म्हणून हिंगोली शहरातील मौंढयातील बुद्रुक पाटील या आडत दुकानदाराचे आडत दुकानाचा दरवाजा तोडून चोरी केली. जिथे घटना घडते तिथे पोलीस आणि श्वान पथक पोहोचतात, पण चोरटे काय पोलिसांना सापडत नाहीत,त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर नागरिक आता प्रश्न चिन्ह निर्माण करीत आहेत.

शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनानांनी त्रस्त झालेल्या नागरीक आणि व्यापाऱ्यांनी आज संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली. तर चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोऱ्या केल्यात. जिल्हाभरात मटका जुगार गांजा सर्हास सुरू आहे. पण पोलीस यंत्रनेला जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवता येत नाही येत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार तर 2 जण जखमी

कोल्हापूर पोलिसांची देशातील मोठी कारवाई, आलिशान गाड्या चोरणाऱ्या टोळीला अटक