in

बेघरांच्या निवारागृहांचा गांभीर्याने विचार करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. मात्र, मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय शहर बनायचे असेल तर बेघरांच्या प्रश्नांवरही गांभीर्याने पावले उचलायला हवीत, असे उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले.

मुंबईत बेघरांचा प्रश्न सुटलेला नाही. पावसाळ्यात बेघरांचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे त्यांना राहण्यासाठी निवारागृहे उभी करावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस.पी. देशमुख व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज, ते बुडतच चाललंय’

IT कंपन्यात ३० लाख लोकांच्या नोकऱ्यावर गदा