in

कोरोना नियमांचे तीनतेरा, बैलगाडी शर्यती सुरूच

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यात डोंबिवली जवळील अंतार्ली गावात कोरोना नियम बाजूला सारत बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले असून सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली असताना न्यायालयाचे आदेश झुगारून कल्याण ग्रामीण भागात बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले गेले आहे तर मानपाडा पोलिसांनी देखील याकडे कानडोळा केला असल्याचं समोर आलं आहे.

कोरोना नियम पायदळी तुडवत हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी बैलगाडी शर्यती पाहायला गर्दी केली होती. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाटने गावात गुन्हे दाखल झाल्या नंतर आता बैलगाडी शर्यती मानपाडा पोलीस ठाण्याच्या अंतार्ली गावात भरवल्या असल्याच समोर आलं आहे. एकीकडे ग्रामीण भागात कोरोनान हाहाकार माजवला असताना कोणाच्या सांगण्याने या बैलगाडा शर्यती भरवल्या जात आहेत असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून या बैलगाडी शर्यती सुरू असून पोलीस देखील बघ्यांची भूमिका घेत असल्याच समोर आलं आहे. एकीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने जमावबंदी जाहीर केली असताना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र बैलगाडी शर्यतींची जत्राच भरली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

व्हायरल व्हिडीओ| धक्कादायक! दोघांनी कोरोना रुग्णाचा मृतदेह फेकला नदीत

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन करणार ‘तो’ अज्ञात व्यक्ती कोण ?