लोकशाही न्यूज नेटवर्क
काँग्रेस खासदार राहुल गांधी लोकसभेत आज प्रचंड आक्रमक बघायला मिळाले. त्यांनी लोकसभेत आपलं मत मांडताना मोदी सरकारवर सडकून टीका केली. हे सरकार म्हणजे हम दो, हमारे दो, असं सरकार आहे, असा घणाघात त्यांनी केला. बाजार समित्या बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. देशाचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही ते म्हणाले आहेत. यावेळी भाजपा खासदारांनी मोठ्या प्रमाणात सभागृहात गदारोळ घातला.
“काही वर्षांपूर्वी ‘हम दो हमारे दो’ घोषणा देण्यात आला होती. कोरोना ज्याप्रमाणे दुसऱ्या रुपात आला आहे तसंच ही घोषणा आली आहे. हा देश चार लोक चालवतात ‘हम दो और हमारे दो’,” असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. नरेंद्र मोदी हेतूबद्दल बोलले होते, मात्र त्यांचा हेतू फक्त आपल्या मित्रांची मदत करणं आहे असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. भूक, बेरोजगारी हे पर्याय आपण दिले आहेत असं उत्तरही त्यांनी नरेंद्र मोदींना दिलं आहे.
Comments
Loading…