in

राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात उदय सामंत यांनी दिली ही महत्त्वाची माहिती

राज्यातील शाळा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरु झाले आहे. पण राज्यातील महाविद्यालयं कधी सुरु होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. याबाबात राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामत यांनी दिली आहे.

1 नोव्हेंबरपासून कॉलेज सुरु करावं असं यूजीसी आणि एआयसीटीईचं म्हणणं आहे. मात्र त्याच कालावधीमध्ये आपल्याकडे दिवाळीचा सण आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष दिवाळीनंतरच सुरु होईल अशी परिस्थिती आहे. त्यावेळी किती टक्क्यांवर महाविद्यालयं सुरु करायचा याचा विचार केला जाईल. पण कॉलेज सुरु करण्याच्या मनस्थितीत सरकार आहे असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्यातरी शैक्षणिक वर्ष ऑनलाईनंच सुरु करण्याचा विचार आहे. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती कमी झालेली आहे, काही जिल्ह्यांमध्ये शुन्य रुग्णसंख्या आहे, अशा जिल्ह्यात कॉलेज सुरु करायची का याबाबत विचार सुरु आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे त्या ठिकाणी कॉलेज सुरु करायला हरकत नाही, पण ते करत असताना मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सशी चर्चा करुनच पुढचा निर्णय घेतला जाईल असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

औरंगाबादेत ओबीसी मेळाव्याचे बॅनर फाडले; भाजपमध्ये संताप

गोवंडीतून पोलिसांनी केले ड्रग्स जप्त