in

बापरे ! एवढे आहे कोव्हिशिल्ड लसीचे निर्माते अदार पुनावालांनी घेतेला लंडनमधील बंगल्याचे भाडे …

कोरोनाच्या कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन करणारी कंपनी सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ अदार पुनावाला (Adar poonawala) यांनी लंडनमध्ये एक आलिशान बंगला भाड्याने घेतला आहे. या बंगल्याचे भाडेच एवढे आहे की तेथील मंदीत चाललेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला चांगलाच जोर मिळला आहे. एका आठवड्यासाठी पुनावालानी त्या बंगल्यासाठी खूप मोठी किंमत मोजली आहे. ही किंमत ऐकून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल.

अदार पुनावाला एका आठवड्यासाठी या बंगल्याचे 50 लाख रुपये भाडे देणार आहेत. हा बंगला लंडनच्या महागड्या असणाऱ्या मफेय़र भागात आहे. हा लंडनच नाही तर जगातील सर्वात महागड्या भागापैकी एक आहे. पुनावाला यांनी हा अलिशान बंगला भाडेतत्वावर घेतला आहे. जवळपास 25 हजार वर्गफुट एवढा अवाढव्य हा बंगला आहे. या आकारात इंग्रजांचे सरासरी 24 घरे बसतात. या प्रॉपर्टीमध्ये एक गेस्ट हाऊस आणि एक सीक्रेट गार्डनदेखील आहे. या डीलमुळे लंडनच्या लक्झरी मार्केटला मोठा बूस्ट मिळणार आहे. ब्रेक्झिट आणि कोरोना महामारीमुळे तेथील रिअल इस्टेट व्यवसाय प्रभावित झाला होता. गेल्या पाच वर्षांत मफेयर भागातील भाडे जवळपास 9.2 टक्क्यांनी घसरले होते.

अदार पुनावाला यांच्या कंपनीने AstraZeneca सोबत करार करून कोरोनाचे करोडो डोस बनविले आहेत. यामुळे त्यांचे ब्रिटनला वारंवार येणेजाणे होत आहे. या आधी त्यांनी मफेयरमधीलच ग्रॉसवेनोर हॉटेल खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते असफल झाले होते. पुनावाला यांचे कुटुंबीय हे जगातील अब्जाधीशांच्या रांगेत बसते. त्यांच्या कुटुंबाची संपत्ती ही 1,08,993 कोटी रुपये एवढी आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रात्रीस खेळ चाले-3 मालिकेत दिसणार या 2 लोकप्रिय अभिनेत्री

अँटिलिया स्फोटक प्रकरण : कोठडीची मुदत संपल्याने सचिन वाझे एनआयए कोर्टात हजर