लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा माघी गणेशोत्सव काळजी घेऊन काही अटींसह साजरा करण्याचा निर्णय टिटवाळ्याच्या महागणपती मंदिर समितीने घेतला आहे. यंदा या उत्सवात काही बदल केले जाणार आहेत.
१५ जानेवारी रोजी माघी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.
दरवर्षी टिटवाळ्याच्या महागणपती मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात गणेशजन्म, पालखी आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पडतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशजन्माच्या सोहळ्यात मंदिराचे विश्वस्त आणि कीर्तनकार अशा ८ ते १० जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
भाविकांसाठी या सोहळ्याचं मंदिराबाहेर मोठ्या पडद्यावर तसंच केबलवर प्रक्षेपण केलं जाणार असून टिटवाळा गावातून निघणारी गणेशाची पालखीही यंदा रद्द करण्यात आली. ही पालखी यंदा फक्त मंदिर परिसरात फिरवून मंदिरात आणली जाईल. या काळात भाविकांनी टप्प्याटप्प्याने दर्शनाला यावं, तसंच सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळावेत, असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलंय.
Comments
Loading…