लोकशाही न्यूज नेटवर्क | भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ठाणे, वसई-विरारमधील हे भाजपचे कार्यकर्ते होते.
ठाणे मनसे जिल्ह्याध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे, वसई येथील हजार कार्यकर्त्यांनी आज मनसेत जाहीर प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. हे कार्यकर्ते भाजप आणि शिवसेनेचे आहेत.
विशेष म्हणजे या प्रवेश सोहळ्यात चांदिवलीतील 500 उत्तर भारतीय मनसेत प्रवेश करणार आहेत. ज्या उत्तर भारतीयांविरोधात मनसेने एकेकाळी खळखट्य़ाक आंदोलन पुकारले होते, तेच उत्तर भारतीय आता मनसेकडे आकर्षित होताना दिसत आहे. त्यामुळे मनसेमध्ये उत्तर भारतीय कार्यकर्त्यांची ताकद वाढताना दिसते आहे.
Comments
Loading…