in

Unlockनंतर राज्यात पुन्हा कोरोनाचा धोका; राज्यातील 9 जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात कोरोनाव्हायरसचा सर्वात पहिला रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर मुंबईतही कोरोनानं शिरकाव केला. त्यानंतर या दोन्ही ठिकाणी कोरोनानं आपले हातपाय इतक्या प्रमाणात पसरले की सर्वांचं लक्ष तिथंच गेलं. आतापर्यंत मुंबई, पुण्यातच कोरोनाच्या सर्वाधिक प्रकरणांची नोंद होत असल्याचं दिसून आलं. पण नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मुंबई, पुणे नव्हे तर आता राज्यातील एक छोटासा जिल्हा कोरोनाचा नवा हॉस्पॉट बनला आहे. या छोट्याशा जिल्ह्यावर कोरोनासह बर्ड फ्लू असं दुहेरी संकट आहे.

शहरातील कोरोनाची रुग्णसंख्य आटोक्यात येत असून नव्या आकडेवारीनुसार राज्यातील नऊ जिल्हे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट ठरतायत. अमरावती, अकोला, नंदूरबार, वर्धा, रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. तर नागपूर, सातारा आणि नाशिक इथं अजूनही दैनंदिन रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. आरोग्यविभागातर्फे दर कमी करण्यासाठी त्रिसूत्री कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्या अंतर्गत रुग्णांचा शोध, निदान आणि चाचणी या माध्यमातून काम कऱण्यात येत आहे. तसंच कोरोनाविषयक उपचारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

11 वी प्रवेशासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

‘अहिल्यादेवींसारख्या व्यक्तिमत्त्वांना जातीमध्ये विभागणं दुर्देवी’