लोकशाही न्यूज नेटवर्क | गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणात ४८ तासात तीन जणांना अटक करण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले आहे. सचिन किसन शिंदे (वय 32), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) अशी आरोपींची नावे आहेत. हत्येमागचं कारण अद्याप समोर आले नाही आहे.
सचिन शिंदे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून पुण्यातील शिक्रापूर, रांजणगाव या भागात त्याची मोठी दहशत होती. सचिन शिंदेवर अनेक गुन्हे दाखल होते. तो काही दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहातून जामीनावर बाहेर आला होता. मंगळवारी ९ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास लोणीकंद येथे दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सचिन शिंदे याचा जागीच मृत्यू झाला. तर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
या प्रकरणात लोणीकंद पोलिसांनी ४८ तासात तीन जणांना जेरबंद केले आहे. सचिन किसन शिंदे (वय ३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) अशी या आरोपींची नावे आहेत.गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आरोपींकडून पोलिसांनी जप्त केले आहे. सदर गुन्हा आरोपींनी साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती समोर आली असून अद्याप तरी या हत्येमागचं कारण समजू शकलेलं नाही.
Comments
Loading…