in

जालन्यात खड्ड्यामध्ये बुडून तीन बालकांचा मृत्यू

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील कुसळी गावामध्ये धक्कादायक घटना समोर येत आहे. घरासमोरील पाणी साचलेल्या खड्ड्यामध्ये बुडून तीन बालकांचा मृत्यू झाल आहे. मनोज अंकुश वैद्य, दीपाली अंकुश वैद्य आणि आकाश संजय वैद्य अशी मृतांची नावं आहेत. दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय.. त्यामुळं जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहता आहेत, अशातच अंकुश वैद्य यांच्या शेतात पाझर तलावासाठी एक छोटासा खड्डा तयार करण्यात आला होता, या खड्ड्यात बुडून या तिन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सायंकाळ चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. दरम्यान एकाच कुटुंबातील तीन बालकांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यानं गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सांगलीत शेततळ्यात पडून 2 बालकांचा मृत्यू , घटनास्थळी आक्रोश

71 हजार रिक्षा चालकांच्या खात्यात लॉकडाऊन मदत जमा