in

अंबरनाथमध्ये केमिकलच्या टाकीत गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू

अंबरनाथ – मयुरेश जाधव | अंबरनाथमध्ये केमिकलच्या टाकीत गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास अंबरनाथ आयटीआय परिसरात असलेल्या इंडस्ट्रीयल इस्टर्स अॅण्ड केमिकल्स कंपनीत ही घटना घडली.

या कंपनीत वेस्ट ऑइलवर प्रक्रिया करून रिसायकल करण्याचे काम केले जाते. तेलातील टार भूमिगत टाक्यांमध्ये साठवला जातो. ही कंपनी दोन वर्षांपासून बंद असून सध्या कंपनीच्या साफसफाई आणि नूतनीकरणाचे काम सुरू होते. यासाठी गोवंडी इथून चार कामगारांना रंगकामासाठी आणण्यात आले होते. कंपनीच्या आवारात केमिकलच्या भूमिगत टाकी साफ करत असताना हे कामगार केमिकलच्या उग्र दर्पामुळे गुदमरले. चौघांपैकी एक कामगार लागलीच बाहेर आला. तर इतर तिघे टाकीतच बेशुद्ध पडले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यू झालेले तिन्ही कामगार मूळचे उत्तर प्रदेशचे असून त्यांना या कामासाठी कुठल्याही सुरक्षात्मक वस्तू, मास्क, ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले नव्हते. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पालिका अग्निशमन दल, एमआयडीसी अग्निशमन दल आणि उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत या तीन कामगारांचे मृतदेह बाहेर काढले. प्रथमदर्शनी या घटनेत निष्काळजीपणा दिसत असून संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान मोदींनी खरंच बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता का?

दीपाली चव्हाण आत्महत्या : आमदार रवी राणा यांच्या पत्राकडे तत्कालीन वनमंत्र्यांनी केले दुर्लक्ष