in

नाशिकमध्ये कोरोना नियमांचे तीन-तेरा; भावी पोलीस अधिकाऱ्यांकडून नियमांना हरताळ

नाशिक जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे  रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. असे असताना देखील नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात चक्क भावी पोलीस अधिकाऱ्यांकडूनच नियमांना हरताळ होताना दिसून आले.

येत्या 30 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीक्षांत सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई सुध्दा हजर राहणार आहे. राज्य शासनाच्या सेवेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. हे ज्या शहरात नाचत आहेत त्या नाशिक शहरात आज 2090 रुग्ण तर जिल्ह्यात 4099 कोरोना बाधीत निघाले आहेत. जिल्ह्यातील एकटिव्ह केस 20905 एवढे आहेत. एवढा निष्काळजीपणा नाशिकच्या MPA मधला आहे. त्यामुळे कोरोना रोखणारे जर हा हलगर्जी पण करत असतील तर बाकीच्यांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

प्रभादेवीत गोदामाला भीषण आग