जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्स यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. मंगळवारी लॉस एंजेलिसमध्ये वुड्स यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात वुड्स यांच्या पायाला इजा झाली ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
लॉस एंजेलिसमधील रोलिंग हिल्स एस्टेट्स आणि रँचो पालोस वेरिड्सच्या दरम्यान सकाळी हा अपघात झाला. ब्लॅकहॉर्स रोडवरून जाताना वुड्स यांची कार दुभाजकावर आदळली. कारचं प्रचंड नुकसान झालं असून वुड्स गंभीर जखमी आहेत.
अपघातानंतर वुड्स यांना रुग्णवाहिकेच्या साहाय्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं असून स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर सर्जरी केली जाणार असल्याची माहिती आहे.
Comments
Loading…