in

टिकटॉक फेम सूरज चव्हाण झळकणार चित्रपटात,”का रं देवा” चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

एकाच वेळी लाखो लोकांशी आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि तमाम लोकांना आपल्या “गोलीगत” आणि “बुक्कीत टेंगुळ” या प्रसिद्ध डायलॉगने आनंद देणारा टिकटॉक फेम सूरज चव्हाण आता सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे निर्मित “का रं देवा” या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

बारामती तालुक्‍यातील मोडवे गावातील सूरज चव्हाण हा टिक टॉकवर प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षभरात त्याला 10 लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केलेले आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेला हा मुलगा अवघ्या महाराष्ट्राला आपले आई-वडील मानतो. लहानपणापासूनच तो बोबडा बोलतो. बोबडे बोलणे हे त्याचे शारीरिक व्यंग, मात्र त्याचे व्यंगच त्याचे बलस्थान ठरले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने लोकांना आपलेसे केले.

नवोदित कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे या चित्रपटाचे निर्माते प्रशांत शिंगटे यांची भेटही सुरज सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली आणि त्यांनी सुरजला आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांचं आहे. अभिनेत्री मोनालिसा बागल, मयूर लाड, अभिनेते जयवंत वाडकर, अरुण नलावडे आणि नागेश भोसले यांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

टिकटॉकने मला रातोरात मोठे केले आणि मी जगभरात पोहचलो. प्रशांतजी मला स्वतः भेटायला माझ्या घरी आले आणि त्यांनी मला ही ऑफर दिली तेव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. लिहिता वाचता न येणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला एक निर्माता शोधत घरापर्यंत पोहचतो ही कल्पनाच मी करू शकत नव्हतो. माझ्या शैलीला साजेशी अशी कॉलेजमधल्या मुलाची भूमिका मी साकारली असून प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धक्कादायक ! हॉस्पिटलच्या चेंबरमध्ये आढळले अर्भकाचे हाडे व कवट्या

हिंगणघाटात मनसेला खिंडार; प्रदेश उपाध्यक्षसह पदाधिकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश!