in

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र मोठी तपास यंत्रणा म्हणून ओळख असणाऱ्या सीबीआयच्या हाती काहीच लागलेलं नाही. 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळ्याला फास लावत आत्महत्या केली होती. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी एजीआर रजिस्टर करत तपास सुरु केला होता.

या दरम्यान बिहार पोलिसांनी सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीऱ्याच्या आधारे त्याच्या गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह तिचं कुटुंब आणि मॅनेजर श्रुती मोदीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपण्यात आले. मुंबई पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा हे प्रकरण बिहारहून सीबीआयकडे गेलं

त्यावेळी सीबीआयनं आपल्या तपासासाठी वांद्रे पोलीस ठाण्यातील सर्व दस्तावेज आपल्याकडे घेतले होते. मात्र येवढे सर्व झाले तरी सीबीआयचा तपास आतापर्यंत पूर्ण झालेला नाही. त्यामुळेच सीबीआयनं आतापर्यंत ती ओरिजनल कागदपत्र मुंबई पोलिसांना परत केलेली नाहीत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

French Open : जोकोव्हिचनं पटकावलं १९वं ग्रँडस्लॅम जेतेपद

राम मंदिर ट्रस्टवर घोटाळ्याचा गंभीर आरोप; 2 कोटीच्या जमिनीची किंमत 5 मिनिटांत झाली 18.5 कोटी