in

Tokyo Olympic 2020 | लव्हलिना बोर्गोहेन बॉक्सिंगपटूचं पदक निश्चित होताच सरकार लागलं कामाला…

टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकल्यानंतर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. आता शुक्रवारी सातव्या दिवशी बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने पदक निश्चित केलंय. महिलांच्या ६९ किलो वजनी गटात तिने पदकाची निश्चिती करत भारतीयांना सुखद धक्का दिला.

लव्हलिनाने चायनीज तैपेईच्या माजी विश्वविजेत्या नीन-शिन चेनला नामोहरम केले. लव्हलिना आसाममधील बरोमुखिया गावात राहणारी आहे. आसाममध्ये पहिल्यांदाच लव्हलिनाच्या माध्यमातून पदक येणार आहे. पदक निश्चितीनंतर आसाम सरकार कामाला लागलं आहे.

लव्हलिनाच्या घराजवळ जाणारा कच्चा मार्ग व्यवस्थित करण्याचं काम सुरु झालं आहे. मुसळधार पावसामुळे तिच्या घराजवळ जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला होता. राज्याचं बांधकाम विभाग हा रस्ता व्यवस्थित करण्यासाठी कामाला लागलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नवी मुंबईतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू, भाजपातर्फे 8 ट्रक जीवनावश्यक वस्तू रवाना

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाची कडक अंमलबजावणी