in

Tokyo Olympic | “विजयी स्पर्धकांनो, स्वत:च कौतुक स्वत:च करुन घ्या!

यंदाची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलैपासून खेळवली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे यजमानपद जपानकडे देण्यात आले आहे. कोरोनाचे वाढते सावट असल्याने मागील वर्षी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती मात्र यंदा जपानच्या टोकीयो शहरात ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर या स्पर्धेत नव्याने नियम वाढवण्यात आले आहेत.

यावेळी सर्व विजेत्या खेळाडूंना पदकं स्वत:च्या गळ्यात स्वत:च घालावी लागणार आहेत. दरवर्षी पाहुणे विजेत्यांच्या गळ्यात पदके घालून त्यांचा सन्मान करत असतात. हा कार्यक्रम व्यासपीठावर पार पडत असे. मात्र यंदा सोशल डिस्टन्सिंगचे कारण पुढे करत ऑलिम्पिकच्या समितीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एका ट्रे मध्ये ही पदके ठेवली जाणार असून विजेत्या खेळाडूंनी ती स्वत:च गळ्यात घालायची आहेत. हस्तांदोलन करणे देखील टाळायचे आहे. कोरोनाच्या नियमावलीमुळे हा निर्णय घेण्याची आल्याची माहिती मिळत आहे.

व्यवस्थापक आणि खेळाडूंना यावेळी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी सविस्तर माहिती दिलीय.

२३ जुलै २०२१ रोजी यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा जपानच्या टोकियो शहरात पार पडणार आहे. यंदा १८ स्पर्धामध्ये भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. गेल्या वर्षी करोना संकटामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. आतापर्यंत स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची ही सर्वाधिक संख्या आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘प्रेग्नन्सी बायबल’ करिनाला भोवणार? बीडमध्ये पोलिसांत तक्रार दाखल

‘या’ व्हिडीओमुळे झाल्या ट्रोल सुझान खान आणि ताहिरा कश्यप