in

Tokyo Olympics : वंदना कटारियाची हॅटट्रिक, भारतीय महिला संघाची दक्षिण आफ्रिकेवर मात

वंदना कटारियाने केलेल्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेवर ४-३ अशी मात केली. या विजयासोबतच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.

भारताकडून वंदना कटारियाने तीन आणि नेहा गोयल हिने एक गोल केला. दरम्यान, वंदना कटारिया ही ऑलिम्पिकमध्ये हॅटट्रिक नोंदवणारी वंदना कटारिया ही भारताची महिला हॉकीपटू ठरली आहे.

अखेर शेवटच्या क्वार्टरमध्ये ४९ व्या मिनिटाला वंदना कटारियाने सामन्यातील आपला तिसरा गोल करून भारताला सामन्यात ४-३ अशी आघाडी केली. त्यानंतर मात्र भारतीय खेळाडूंनी भक्कम बचाव करत दक्षिण आफ्रिकेचे आक्रमण थोपवले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Bank Holidays| ऑगस्टमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, लवकर करून घ्या तुमची काम

महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला वाहन चालकाला सॅल्युट