in ,

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा पॅराशूटर सिंहराज अधानाला कांस्य पदक

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा पॅराशूटर सिंहराज अधानानं कांस्य पदकाची कमाई केली आहे. अधानाने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल P1 प्रकारात कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यासोबतच या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या ८ वर पोहोचली आहे.
असाका शूटिंग रेंजमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात सिंहराज अधाना आणि चीनच्या लू शीयोलोंग आमने-सामने आले होते. दोघांमध्येही अटी-तटीचा सामना रंगला होता. परंतु, शेवटी सिंहराजनं धमाकेदार खेळी करत 216.8 अकांसह कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं.

मात्र टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंसाठी आजचा दिवस निराशाजनक जात आहे. सकाळपासून एका पाठोपाठ एक खेळामध्ये भारताचे पदकाचे प्रबळ दावेदार पराभूत होत आहेत. भारताला यंदाच्या पॅरालिम्पिक्समध्ये पहिलं पदक मिळवून देणारी भाविना पटेल महिला दुहेरीच्या स्पर्धेत सोनल पटेलसोबत पराभूत झाली असून निशानेबाज रुबिना फ्रान्सिस आणि तिरंदाज राकेश कुमारही पराभूत झाले आहेत.

आतापर्यंत केवळ भारतीय पुरुष नेमबाजच ugR. 10 मीटर एअर पिस्टल SH1 मध्ये अंतिम फेरीत पोहोचले. मनीष नरवाल पात्रता फेरीत अव्वल स्थनावर होता.टेबल टेनिसमध्ये भारताला ऐतिहासिक कामगिरी करत पदक मिळवून देणारी भाविना पटेल महिला दुहेरी फेरीत पहिल्याच सामन्यात पराभूत झाली आहे. सोनल पटेलसोबत क्लास 4 आणि क्लास 3 च्या महिला दुहेरी स्पर्धेत भारताच्या या जोडीला चीनच्या टेबल टेनिसपटूंनी पराभूत केलं. या सामन्यात 11-2, 11-4, 11-2 अशा फरकाने भारत पराभूत झाला. विशेष म्हणजे हा सामना जिंकल्यास किमान कांस्य पदक निश्चित झालं असतं.

भारताची नेमबाज रुबिना फ्रान्सिस महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल एसएच1 च्या अंतिम फेरीमध्ये सातव्या स्थानावर राहिली. रूबिनाने असाका शूटिंग रेंजमध्ये फायनलमध्ये 128.1 गुण मिळवले. दरम्यान या स्पर्धेत इरानची सारेह जवानमार्दी 239.2 गुणांसह सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी झाली.

राकेश कुमार पॅरालिम्पिक खेळांत तिरंदाजीतील पुरुष व्यक्तिगत कंपाउंडच्या उपांत्य पूर्व फेरीत चीनच्या के अल झिनलियांगविरुद्ध अगदी 143-145 अशा फरकाने पराभूत झाला. पण पुन्हा त्याने पुनरागमन करत उत्तम खेळ दाखवला पण अखेर तो पराभूत झाला.

Archery
Date and Time: Tue 31 Aug. 9:00 – 14:15
Date and Time: Tue 31 Aug. 17:30 – 21:20

Athletics
Date and Time: Tue 31 Aug. 9:30 – 12:45
Date and Time: Tue 31 Aug. 19:00 – 22:05

Boccia
Date and Time: Tue 31 Aug. 9:30 – 14:20
Date and Time: Tue 31 Aug. 16:00 – 19:45

Cycling Road
Date and Time: Tue 31 Aug. 8:00 – 17:15

Football 5-a-side
Date and Time: Tue 31 Aug. 9:00 – 13:00
Date and Time: Tue 31 Aug. 16:30 – 18:00
Date and Time: Tue 31 Aug. 19:30 – 21:00

Goalball
Date and Time: Tue 31 Aug. 13:15 – 16:15
Date and Time: Tue 31 Aug. 17:45 – 20:45

Shooting
Date and Time: Tue 31 Aug. 9:30 – 15:30

Sitting Volleyball
Date and Time: Tue 31 Aug. 10:00 – 11:30
Date and Time: Tue 31 Aug. 14:00 – 15:30
Date and Time: Tue 31 Aug. 18:30 – 22:00

Swimming
Date and Time: Tue 31 Aug. 9:00 – 11:30
Date and Time: Tue 31 Aug. 17:00 – 20:35

Table Tennis
Date and Time: Tue 31 Aug. 10:00 – 14:30
Date and Time: Tue 31 Aug. 16:30 – 21:00

Wheelchair Basketball
Date and Time: Tue 31 Aug. 9:00 – 10:45
Date and Time: Tue 31 Aug. 12:30 – 16:30
Date and Time: Tue 31 Aug. 18:15 – 22:15

Wheelchair Tennis
Date and Time: Tue 31 Aug. 11:00 – 20:00

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रत्नागिरीच्या मनोरुणालयात २० रुग्ण ‘कोरोना पॉझिटिव्ह’

स्वातंत्र्य काळापासून तीन पिढ्यांचा रस्त्यासाठी संघर्ष