in

टॉलिवूड अभिनेता साई धरम तेज अपघातात गंभीर जखमी

तेलुगू चित्रपट अभिनेता साई धरम तेज ( Sai Dharam Tej ) शुक्रवारी रात्री एका रस्ते अपघातात जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तो स्पोर्ट्स बाईक चालवत होता आणि चिखलात घसरला. हैदराबादमधील दुर्गमचेरुवु केबल पुलाजवळ ही घटना घडली. अपघातानंतर सई बेशुद्ध झाला होता. त्याला गंभीर दुखापत झाली असून 34 वर्षीय सईला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

मेडिकोव्हर रुग्णालयात उपचार केल्यानंतर साई धरम तेजला अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले. अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मतानुसार तो धोक्याबाहेर आहे, त्याला डोके, पाठीचा कणा यासारख्या अवयवांना कोणतीही अंतर्गत दुखापत झालेली नाही. साईला पुढील 48 तास व्हेंटिलेटरवर निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, तसेच तो लवकरच बरा होईल असे सांगण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ghatkopar

Vikhorli