टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दिशा रवीची आज ३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पतियाला न्यायालयाने हा निर्णय दिला.
दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दिशा रवीला पतियाला न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी न्यायालयासमोर दिशाची पोलीस कोठडी वाढवून मागताना दिल्ली पोलिसांनी ‘दिशा चौकशीदरम्यान इतर आरोपींना दोष देत होती. त्यामुळे तिची शंतनु मुळूकसोबत समोरासमोर चौकशी करण्याची गरज आहे असल्याचे यावेळी सांगितले.
दरम्यान २२ फेब्रुवारी रोजी त्याची चौकशी होणार असून तोपर्यंत दिशाला पोलीस कोठडीतच ठेवण्याची मागणी’ पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र, ही मागणी फेटाळून लावण्यात आली.
Comments
Loading…