in

रेल्वेत महिलेची छेड काढल्याप्रकरणी NCB चा बडा अधिकारी अटकेत

विकास माने, बीड | बीडमध्ये एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधीक्षक दिनेश चव्हाण यांना परळी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना परळी रेल्वे पोलीस हद्दीतील लातूर रोड स्टेशनच्या परिसरात घडली.

रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा उदगीर ते लातूर रोड दरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधीक्षक दिनेश चव्हाण यांनी एका महिलेची छेड काढली. त्यानंतर या महिलेने रेल्वे पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार रेल्वे पोलिसांनी दिनेश चव्हाण यांना अटक केली. त्यांच्यावर भादवि 354, 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना औरंगाबाद येथील न्यायालयात नेण्यात आले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दरडग्रस्तांना अखेर मिळाला निवारा,पहिल्या टप्प्यात आज ६२ घरांचा ताबा

माफी मागा, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांना कायदेशीर नोटीस