in ,

उद्या लाँच होणार देशातील पहिला CNG ट्रॅक्टर

लोकशाही न्यूज नेटवर्क

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींपासून शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. ट्रॅक्टरमध्ये सीएनजी बसविण्यात येणार आहे. उद्या संध्याकाळी पाच वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी देशातील पहिला सीएनजी फिटेड ट्रॅक्टर लॉन्च करणार आहेत. आता शेतामध्ये ही सीएनजी असणारे ट्रॅक्टर पाहायला मिळणार आहेत. या नव्या प्रयोगामुळे तकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

रावमेट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिली इंडियाद्वारे सीएनजी बसविण्यात येणार आहे. सीएनजी एक स्वच्छ इंधन असल्यामुळे कार्बन आणि इतर प्रदूषित कण फार कमी उत्सर्जित होतात. पारंपारिक ट्रॅक्टरपेक्षा नवीन तंत्रज्ञानाद्वारे रूपांतरित सीएनजी इंजिनचे आयुष्य जास्त असेल. सीएनजी ट्रॅक्टरचे मायलेज डिझेलच्या तुलनेत खूप जास्त असेल. एवढेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज चढ-उतार होत असतात, या तुलनेत सीएनजीच्या चढ-उतारांच्या किंमती खूप कमी असतात.

सीएनजी एक स्वच्छ इंधन आहे, ज्यामुळे कार्बन आणि इतर प्रदूषित कण फार कमी उत्सर्जित होतात. नवीन तंत्रज्ञानाद्वारे रूपांतरित सीएनजी इंजिनचे आयुष्य पारंपारिक ट्रॅक्टरपेक्षा जास्त असेल. डिझेलच्या तुलनेत सीएनजी ट्रॅक्टरचे मायलेज खूप जास्त असेल.पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा सीएनजी खूप स्वस्त आहे. त्याच प्रमाणे सीएनजी ट्रॅक्टर्संना डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरांच्या तुलनेत जास्त पॉवर मिळते. डिझेलच्या तुलनेत सीएनजीपासून 70 टक्के कमी उत्सर्जन होते. त्याचा प्रमाणे कचऱ्यापासून मौल्यवान वस्तू बनविण्याच्या पर्यायाला पुढे आणखी बळकटी मिळते. पेंढ्यांचा वापर बायो सीएनजी तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे केवळ शेतकऱ्यांचे उत्पन्नच वाढत नाही तर पेंढ्या जाळल्यामुळे होणारे प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservatio | शरद पवारांना भेटण्यामागचे उदयनराजेंनी सांगितले कारण…

कोरेगाव भीमा प्रकरण; केंद्राच्या तपास यंत्रणेने ‘हा’ अहवाल नाकारला