in

पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

लोकशाही न्यूज नेटवर्क | पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी जमली आहे. तसेच वाहतूक 15 ते 20 मिनिट उशिरा सुरु असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

जोगेश्वरी स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागरिकांना कामावर जाण्याच्या वेळेत हा प्रकार घडल्याने रेल्वे स्थानकावर एकचं गर्दी जमली आहे. त्यामुळे त्यांना ताटकळत रेल्वे स्थानकावर उभे राहावे लागत आहे.

दरम्यान तांत्रिक अडचणीमुळे चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यानच्या सर्व अप आणि डाऊन उपनगरी सेवा 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वने दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Vijay hazare Trophy; मुंबई संघाची घोषणा, श्रेयस अय्यर कर्णधार

Diesel Petrol Price Today | पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ