in

‘द बॅटमॅन’ चा ट्रेलर रिलीज

हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘द बॅटमॅन’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून ट्रेलरला पसंती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते. करोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली जात होती. मात्र अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपील.

४ मार्च २०२२ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून यापूर्वी हा सिनेमा २०२१ सालामध्ये प्रदर्शित होणार होता मात्र करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं. अखेर वॅार्नर ब्रदर्स ने या सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या ट्रेलरवरुनच सिनेमामध्ये अ‍ॅक्शन तसेच रॉबर्ट पॅटिनसन यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

मॅट रीव्सने या सिनेमाची निर्मिती केली असून. २१ जूनला हा सिनेमा रिलीज होणार होता. त्यानंतर ही तारीख बदलून १ ऑक्टोबर करण्यात आली होती. मात्र ऑक्टोबरमध्येही सिनेमाचं प्रदर्शन रद्द करण्यात आलं. अखेर ४ मार्च २०२२ला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या सिनेमाच्या ट्रेलरमुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

SidnNaaz ची अधूरी कहाणी !

वीटभट्टी व्यवसाय; वीटभट्टी मालकांच्या बैठकीत घेतले गेले ‘हे’ निर्णय