in

…तर रेल्वे प्रवाशांना बसणार मोठा भुर्दड

नुकतीच रिक्षा-टॅक्सी भाडे वाढ त्यात सामान्यांना रेल्वे पास देत नसल्याची डोकेदुखी ठरत असताना आता, रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दरात पाच पटीने वाढ केली आहे. त्यामुळे आधीच लॉकडाऊन आर्थिक संकटात सापडलेल्या रेल्वे प्रवाशांना आता मोठा भुर्दड सहन करावा लागणार आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन व आरोग्य विभाग गर्दी टाळण्याच्या सूचना व कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. त्यातच प्रवासाची मुभा मिळाल्यानंतर आता रेल्वे स्थानकतही मोठी गर्दी जमू लागली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आता प्लॅटफॉर्म तिकीट दरात पाच पट वाढ केली आहे. प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता १० रुपयांऐवजी थेट ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

बाहेरगावी जाणारे प्रवाशी आणि त्यांचे नातलग रेल्वे स्थानकांवर गर्दी करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात करोना संसर्ग वाढला आहे. रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दर ५० रुपयांपर्यंत वाढवला असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. गेल्या २४ फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सुट्टीच्या हंगाम संपेपर्यंत म्हणजेच १५ जून २०२१ पर्यंत मध्य रेल्वेच्या महत्वाच्या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटाची दरवाढ लागू राहील, अशी माहिती त्यांनी दिली.

‘या’ रेल्वे स्थानकांचा समावेश

ज्या स्टेशनवर बाहेरगावी जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसना थांबा आहे, अशा स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट दर ५० रुपये करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर , लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, पनवेल, भिवंडी रोड या स्टेशनवर आता प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…तर 35 हजार कोटींची तरतूद कशासाठी? पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदी सरकारला सवाल

आंदोलनातील तरुणाच्या समर्थनार्थ सोशल मीडिया ‘ट्रेंडिंग’