in

मुंबईत टीव्हीमध्ये झाला स्फोट

लहान मूल आणि आईचे प्राण थोडक्यात बचावले

केदार शिंत्रे
मुंबई, कांदिवली पूर्व येथे पोईसर भाजीवाडी चाळ मध्ये रात्री 8 च्या सुमारास चालत्या एलसीडी टीव्ही मध्ये अचानक स्फोट झाल्याने जवळच्या घरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. टीव्हीवर मालिका पाहणारी महिला आणि मूल थोडक्यात बचावले.

ही घटना मंगळवारी संध्याकाळी 8 च्या सुमारास घडली जेव्हा टीव्हीवर मालिका बघणाऱ्या एका घरात टीव्हीमध्ये अचानक स्फोट झाला. टीव्हीचे काही भाग जळून राख झाले. सुदैवाने मूल आणि महिला दोघेही सुखरूप वाचले.
स्फोटानंतर घराला आग लागली.

घरतल्यांनी माहिती दिल्याप्रमाणे स्फोट झालेला टीव्ही सॅमसंग कंपनीचा एलसीडी टीव्ही आहे. स्फोटामुळे, घराच्या आतल्या अनेक वस्तूंच्या नुकसानाव्यतिरिक्त, बेड, कपडे, खिडकीच्या पडद्यांना आग लागली होती. जीवितहानी झाली नाही, परंतु घरात ठेवलेल्या सर्व वस्तूचे नुकसान झाले.

घटनेनंतर लगेचच समता नगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. समता नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक अमोल कांबळे यांनी घटनास्थळी पोहचून लोकांना हटवले आणि नुकसानीचा आढावा घेतला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘Oh My God 2’ चं शूटिंग पुढील दोन आठवड्यांसाठी रद्द

काय खास आहे ‘गोदावरी’ या सिनेमाच्या नावात; जाणून घ्या जितेंद्र जोशी काय म्हणतात