in

Maharashtra Corona । नवीन बाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त

राज्य सरकारने अनलॉकबाबतची नवी नियमावली आज जाहीर केल्याची बातमी असतानाचा आजची नवीन आकडेवारी सुद्धा काही अंशी दिलासादायक आहे. राज्यात आज दिवसभरात आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत जवळपास दुप्पट रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

राज्यात आज रोजी एकूण ७५,३०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात ४ हजार ८६९ नवीन कोरोनाबाधित आढळले. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३ लाख १५ हजार ०६३ झाली आहे. ८ हजार ४२९ रूग्ण कोरोनातून बरे झाले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ३ हजार ३२५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.६५ टक्के एवढे झाले आहे. याशिवाय, आज ९० रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली.राज्यात आजपर्यंत १ लाख ३३ हजार ३८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पशुचिकीत्सा संघटनेचे विविध मागण्यांसाठी बेमुदत संप, कराडमध्ये ‘कामबंद’

“ हा विजय माझ्या एकटीचा नाही”, कांस्य पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने व्यक्त केल्या भावना