मेळघाटमधील आरएफओ दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या मानसिक त्रासाला कंटाळून गुरुवारी रात्री आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमारच जबाबदार असल्याचे लिहिले आहे. त्यानंतर आरोपी शिवकुमारला पोलिसांनी नागपूरमधून अटकही केली.
दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे. दरम्यान प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. दिपाली यांनी मृत्यूपूर्वी आपले पती राजेश मोहिते यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. ते पत्र आता समोर आले असून त्यामध्ये “मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी होणार नाही तिने माझे आयुष्य बरबाद केलं आहे”, अशी ओळ दीपाली चव्हाण यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे आता मनिषा उईके ही कोण आहे? दिपाली चव्हाण यांनी तिचा उल्लेख का केला? तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे, असे त्यांनी का लिहिले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दिपाली चव्हाण यांनी पतीला लिहिलेल्या पत्रात ज्या मनीषा उईकेचा उल्लेख केला आहे. ती मनीषा उईके कोण? तिचा आणि दिपाली चव्हाण यांचा संबंध काय? दिपाली मृत्यू प्रकरणाशी मनीषा उईकेचा संबध आहे का? असे एक ना अनेक प्रश्न नव्याने उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी आता मनिषा उईके कोण आणि तिचा या प्रकरणाशी काय संबंध आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे.
Comments
Loading…