in

ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरण : दिशा रवी बंगळुरूतून ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क

ट्विटर टूलकिट प्रकरणी पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवी या तरुणीला दिल्ली पोलिसांनी बंगळुरू मधून अटक केली. ४ फेब्रुवारी रोजी ट्विटर टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवी ही फ्रायडे फॉर फ्युचर कॅपेनची दिशा ही एक संस्थापक सदस्य आहे. बंगळुरूतील सोलदेवानापल्ली परिसरात दिशा वास्तव्याला असून, याच भागातून पोलिसांनी तिला अटक केली आहे. दिशावर शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करणे आणि आणखी मुद्दे समाविष्ट करून पुढे पाठवल्याचा आरोप करण्यात आले आहे .

काय आहे टूलकिट प्रकरण…
मागील दोन महिन्यांना पासून नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासह इंटरनेट सेवा बंद केली होती. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. या ट्विटसह ग्रेटा थनबर्गने एक टूलकिट ट्विट केले होते. मात्र, काही वेळानंतर ते डिलीट करण्यात आली. याच प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुगल आणि अन्य बड्या सोशल मीडिया कंपन्यांना अधिक माहिती मागवत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात या टूलकिटचा संबंध खलिस्तानी संघटनेशी असल्याचे समोर आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुलवामा हल्ल्याचा दुसरा कट उधळला, सात किलो स्फोटकं जप्त

पुलवामामधील शहिदांना मोदींनी अर्पण केली श्रद्धांजली