in

Twitter ला ठोठावण्यात आला ‘इतक्या’ डॉलर्सचा दंड

आयटी नियमांच्या वादात अडकलेल्या ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला रशियाच्या स्थानिक कोर्टाने ट्विटरला 1.9 दशलक्ष रूबल (259,000 डॉलर्स) इतका दंड ठोठावला आहे. तसेच, अनधिकृत निषेधासाठी कंपनीचा दंड वाढवून 2.79 कोटी रुबल (380,000 डॉलर्स) करण्यात आला आहे. एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात रशियामध्ये अशाच गुन्ह्यांसाठी ट्विटरला 121,000 डॉलर्स इतका दंड ठोठावण्यात आला होता.

सिन्हुआच्या वृत्तसंस्था म्हणण्यानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात मॉस्कोच्या एका कोर्टाने फेसबुक आणि गुगलला अशाच एका आरोपाखाली दंड ठोठावला होता. दरम्यान, भारत सरकारने ट्विटरच्या ताज्या निवेदनावर पलटवार केला आहे, ज्यात भारताने अभिव्यक्ती स्वातंत्र्यास ‘संभाव्य धोका’ असल्याबद्दल ट्विटरबाबत चिंता व्यक्त केली आहे.

आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की, ट्विटर नवीन लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्याच नियमांचे पालन करण्यास नकार देत आहे, ज्या आधारे ते भारतातील कोणत्याही गुन्हेगारी दायित्वापासून सुरक्षित संरक्षणाचा दावा करीत आहेत. ट्विटरने जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी निवडलेले अधिकारी, उद्योग आणि नागरी समाजाच्या सामूहिक जबाबदारीची गरज यावर जोर दिला जात आहे. आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की, ट्विटरने स्वतःहून आता भारतीय कायद्यांचे पालन करायला हवे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Weather Forecast| राज्यात लवकरच होणार मान्सूनचे आगमन

Today Gold Rate| सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, पाहा आजचे दर