in

वर्धात पैशाचा पाऊस पाडणारा मांत्रिक पसार, दोन आरोपींना अटक

प्रतिनिधी : भूपेश बारंगे

वर्धा जिल्ह्यात पैश्याचा पाऊस पाडण्याचं सांगून अघोरी कृत्यातून युवतीचे मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जादू टोण्याद्वारे पैशांचा पाऊस पाडणाऱ्या ढोंगी बाबाच्या सांगण्यावरून पीडितेच्या आई व नातलगाने पीडित तरुणीचे अघोरी कृत्यातून वर्षभरापासून शोषण केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भांडाफोड रामनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तीन दिवस पोलीस कोठडी मिळवली आहे. महाराष्ट्र सध्या कोरोनासारख्या संकटाला सामोरे जात आहे असे असतानाच अशा गोष्टी समोर येणे धक्कादायक आहे .

आपल्यावरील कर्ज फेडता येईल, आपण मालामाल होवू या आमिषातून पीडितेची आई आणि काका हे दोघे वर्ध्यातील कारला चौकात आले आणि पीडितेला भूलथापा व धमकावून ऐरणगाव, नांदगाव शेत शिवारातील निर्जनस्थळी नेवुन विवस्त्र करून शरिराला लिंबू लावण्याचा धक्कादायक प्रकार केला. हिंगणघाट तालुक्यातील एका गाव जवळील शेतात हा प्रकार घडला. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर हे या प्रकरणी तपास करीत आहेत . या प्रकरणी दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी अनिष्ठ प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचा समुह उच्चटन करण्यासाठी अधिनियम २०१३ कलम ३(२) भादवी ३५४ अधीक ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जालन्यात अवतरला यमराज; कोरोना नियमांची केली जनजागृती

राष्ट्रवादीत प्रवेशाआधी भाजप नेते कल्याणरावांच्या घरी, अरे तुम्हाला कुठे घालायची घाला ना