in

दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक, ट्रॅक्टरसह दहा दुचाकी जप्त

संजय देसाई, सांगली | सांगली शहरासह जिल्हा आणि कर्नाटक राज्यातून मोटार सायकल चोरी करणारी टोळी सांगली पोलिसांनी जेरबंद केली आहे.10 दुचाकी व एक ट्रक्टर जप्त करत 2 जणांना अटक केली असून या मोटार सायकल चोरीच्या टोळीत 9 जणांचा समावेश आहे.सांगली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.

सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हयासह शेजारच्या कर्नाटक राज्यातून मोटरसायकल चोरी करून विक्री करणाऱ्या एका टोळीला सांगली ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. ऋषिकेश कांबळे,वय 22 राहणार, खोतवाडी, तालुका मिरज आणि बाबासाहेब सोनवले,वय वर्ष, 23 राहणार नांद्रे,तालुका मिरज या दोघांना अटक करण्यात आली आहे.तर या दोघांच्याकडे अधिक चौकशी केली असता दोघांनी आपल्या 7 साथीदारांसह दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीतील दहा दुचाकीसह एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. सुमारे साडेसात लाख रुपये किंमतीची ही वाहने सांगली ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केली आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हजारो आगरी कोळी बांधवांना परवाने वाटप

सिल्लोडमध्ये लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान