in

सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या २०२१-२२ या यासाठीच्या सर्व सीईटी परीक्षा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मंगळवारी सांगितले. परीक्षादरम्यान कोरोना नियमांचे पालन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सीईटी परीक्षा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होतील. सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी राज्यभरातील ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी राज्यभरात २२६ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षांसाठी दररोज ५० हजार संगणक उपलब्ध करवून देण्यात येतील. तसेच प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरू करण्यात येईल. तर, अभ्यासक्रम निहाय प्रवेश प्रक्रिया १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्यात येईल, असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे :

  • मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लीकेशन, मास्टर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्टस, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन या परीक्षा १५ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहेत.
  • मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, मास्टर ऑफ बिजनेस ॲडमिनीस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडी या परीक्षा दि. 16 ,17 व 18 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहेत.
  • बॅचलर ऑफ इंजिनिअरींग/टेक्नॉलाजी (B.E/B.TECH), बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharm/Pharm.D), ॲग्रीकल्चर अँड ॲलाईड कोर्स या परीक्षा दि. 20 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021या दरम्यान होणार आहेत.
  • बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन अँड मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ लॉ (5 वर्ष), बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षा दि. 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत.
  • बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन दि.4,5,6 आणि 7 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत. तसेच बॅचलर ऑफ लॉ-(3 वर्ष ) 4 व 5 ऑक्टोबर 2021, बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल, या परीक्षा दि. 6 व 7 ऑक्टोबर 2021रोजी होणार आहेत.
  • बॅचलर ऑफ फाईन आर्ट दि. 9 व 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत, अशी माहिती सामंत यांनी दिली.

या परीक्षेचा निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2021-22 नोव्हेंबरपासून सुरु होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल.राज्य सीईटी कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर तपशीलवार वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

काबुलमध्ये पाकविरोधात काढलेल्या रॅलीवर तालिबानचा गोळीबार

यंदाच्या वर्षीही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा ‘ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव’