in

College Reopen | राज्यातील कॉलेज दिवाळीनंतर सुरु होणार – उदय सामंत

यंदाचं शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरपासून सुरु होईल. मात्र, प्रत्यक्षात कॉलेज दिवाळीनंतर सुरु होतील, अशी माहिती महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक पार पडली. या बैठकीत कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले टाकत आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून निर्णय होईल, असं उदय सामंत म्हणाले. टास्क फोर्ससोबत चर्चा करून एसओपी बनवली जाईल व मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर निर्णय होईल, असं उदय सामंत म्हणाले.

1 नोव्हेंपासून शैक्षणिक वर्ष होईल. परंतु तेव्हाच दिवाळी असल्यानं कदाचित दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होईल.तेव्हाच फिजिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार करतोय, असं उदय सामंत म्हणाले.महाविद्यालय सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे. उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही, असं उदय सामंत म्हणाले.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमित शाहांना घोट्याळ्याची माहिती देणार – किरीट सोमय्या

शिर्डीत ऑक्टोबरमध्ये विशेष लसीकरण मोहिम