in ,

शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे अन् चीन दिसला की पळे, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिषणावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळ त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही घणाघाती टीका केली. शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे, अशी भूमिका केंद्र सरकारची असल्याचे ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार हे कायमच शेतकऱ्यांसोबत आहे, असे सांगतानाच त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ दिले जात नाही. त्यांच्या मार्गात खिळे ठोकले जातात. देशाच्या सीमेवर तारेचे कुंपण टाकण्याऐवजी दिल्लीतील रस्त्यावर टाकले जात आहे. मात्र चीनसमोरून मात्र या सरकारने पळ काढला, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या मार्गावर खिळे आणि चीन दिसला की पळे, अशी यांची अवस्था असल्याची बोचरी टीका करून मुख्यमंत्री म्हणाले, देश म्हणजे तुमची खासगी मालमत्ता नाही, महाराष्ट्र तर नाहीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसाल तर भारत माता की जय म्हणण्याचाही अधिकार तुम्हाला नाही, अशी टीका त्यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IT च्या छाप्यानंतर तापसी पन्नू व अनुराग कश्यपवर ट्रोल

ठाकरे सरकारचे मंत्रीच बेशिस्त इतरांना काय शिस्त लावणार ? पंकजा मुंडेंचा सवाल