in

आपण स्वत:ला पृथ्वीचे मालक समजायला लागलोय…; उद्धव ठाकरेंचा सर्वपक्षीय नेतेमंडळींना टोला!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात वन्यजीव सप्ताह २०२१ चा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण, वनसंरक्षण याबद्दल जनजागृती झाली पाहिजे. पण त्यासोबतच राजकीय नेत्यांचीही जागृती झाली पाहिजे. अनेकदा आपण आपल्या सोयीप्रमाणे कायदे बनवतो. नियम पायदळी तुडवत असतो. हाताने कायदे करायचे आणि पायदळी तुडवायचे. आपण आपल्या सोयीप्रमाणे कायद्याचे अर्थ लावत असतो, अर्थ बदलत असतो. त्यात काही वेळा मोकळीक देत असतो. विकासाचं वेडं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेमका कसला विनाश करतोय, ते न बघता आपण पुढे जात असतो”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, हे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जशी जनजागृती केली जाते, तशीच राजकीय नेत्यांचीही जनजागृती व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सरकारमधील ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबतच वनविभागाचेही अनेक अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली आहे. वनखात्याचा कारभार सध्या मुख्यमंत्र्यांकडेच असल्यामुळे वनमंत्री या नात्याने मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबरनाथच्या बी केबिन रोडवरील वाहतूक कोंडी सुटणार

ठाकरे उड्डाणपुलावर खड्डेच- खड्डे; नागरिकांचा जिव धोक्यात